Gold Price Today जे सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांना सध्याची सोन्याची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. आज, 30 नोव्हेंबरला सोन्याचा भाव जवळपास स्थिर राहिला. त्यात कालच्या तुलनेत 10 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सर्वाधिक प्रभाव पडतो. प्रमुख वित्तीय संस्था आणि देश, विशेषत: अमेरिका, चीन आणि युरोप यांचा सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम होतो.
सोन्याचा अमेरिकन डॉलरच्या किमतीशी जवळचा संबंध आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता असते कारण लोक डॉलरमध्ये गुंतवणूक करतात. याउलट, जेव्हा डॉलरचे मूल्य कमी होते, तेव्हा सोने आकर्षक बनते, कारण इतर चलनांमध्ये सोन्याची किंमत कमी होऊ शकते.
तसेच, जागतिक आर्थिक अस्थिरता, जसे की कर्ज संकट, चलनवाढ आणि आर्थिक मंदीची चिन्हे, (Gold Price Today) सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान म्हणून लोकप्रिय बनवू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत ते पाहू.
22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 71,610 रुपये |
पुणे | 71,610 रुपये |
नागपूर | 71,610 रुपये |
कोल्हापूर | 71,610 रुपये |
जळगाव | 71,610 रुपये |
ठाणे | 71,610 रुपये |
24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 78,120 रुपये |
पुणे | 78,120 रुपये |
नागपूर | 78,120 रुपये |
कोल्हापूर | 78,120 रुपये |
जळगाव | 78,120 रुपये |
ठाणे | 78,120 रुपये |
💥फक्त 1₹ गृहउपयोगी भांडे व सुरक्षा किट बांधकाम कामगारांना वाटप.💥💸📑