E-Pik Pahani List: राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी खरीप हंगामा करिता एक ऑगस्ट पासून करण्यास सुरुवात ही झालेली आहे. यामध्ये शेतकरी स्तरावर 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ही पीक पाहणी शेतकऱ्यांना करता येत होती. यानंतर 16 सप्टेंबर पासून पुढे ज्यांना ही पीक पाहणी करता आलेले नाही त्यांची तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी ही त्यानंतर सुरू होईल. तुमच्या शेतातून तुम्ही स्वतः ही ई-पीक पाहणी तुम्ही करू शकता. ती कशा पद्धतीने करायची, ह्या ई-पीक पाहणी करण्यामागचा नेमका फायदा काय आहे? त्याचबरोबर ही ई-पीक पाहणी कोणत्या गोष्टीसाठी रद्द केलेली आहे? याची सर्व सविस्तर मध्ये बातमी आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत वाचा..
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील असणाऱ्या पिकांची नोंदणी ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ही पिकांची नोंदणी करणे यालाच ई-पीक पाहणी असे म्हटलेले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या चार वर्षांपासून राज्य सरकार हा विशेष उपक्रम राबवत आहे. तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी अगोदर तुम्हाला ई-पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड तुम्हाला करायचा आहे. त्याकरिता तुम्ही प्लेस्टोर च्या माध्यमातून हे ई-पीक पाहणी असं तेथे सर्च करायचे त्यानंतर तुम्हाला ते ॲप तिथे येईल आणि नंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.
तर शेतकरी मित्रांनो ही ई-पीक पाहणी तुम्ही करत असताना चार प्रकारची माहिती लाभ देण्यासाठी यामध्ये वापरली जाते. तर या ॲपच्या मदतीने तुम्ही सर्व प्रक्रिया तुमचे शेताची पिक पाहणी ही सर्व गोष्टी तुम्हाला यामधून करता येतात त्यासाठी तुम्हाला हे ॲप घेणे महत्त्वाचा आहे आणि यामध्ये ही ई-पीक पाहणी करणे फार गरजेचे आहे.E-Pik Pahani List
कारण की तुम्ही जर पीक पाहणी केली तरच तुमच्या पिकाचे नुकसानीचे अनुदानाचे जे काही शासनाच्या माध्यमातून पैसे वितरित होतात ते तुम्हाला मिळू शकतील अन्यथा तुम्ही जर ही पीक पाहणी केली नाही, तर तुम्हाला कोणत्याही अनुदानाचे तसेच तुमच्या झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई ही तुम्हाला मिळणार नाही
जेणेकरून तुम्ही ही पीक पाहणी केलेली नाही त्यामुळे. ही पिक पाहणी करणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आपले पिकांचे अवकाळी पावसामुळे किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाले तर आपली एक नोंद असते पिक पाहणी केलीची त्यामुळे तुम्हाला लिपिक पाहणी करावी लागेल तरच तुम्हाला अनुदानाचे आणि पीक विम्याचे पैसे हे शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळतील.E-Pik Pahani List
लाडक्या बहिणींना हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू, येथे पहा लगेच मिळणार पैसे