Crop Insurance List पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई 13 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या एका माहितीनुसार 25% अग्रीम पिक विमा हा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच देणार. तसेच तब्बल सहा जिल्ह्यांसाठी, नुकसान भरपाई ही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 13 लाख शेतकऱ्यांना जवळपास 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई या दिवसात मंजूर देखील झाले आहे. येत्या काही दिवसातच ही रक्कम सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात देखील होणार आहे.
कधी मिळणार हा पिक विमा Crop Insurance List
राज्याच्या कृषी विभागाने एका दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच-सहा दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी पाठवण्याचा एक निर्णय देखील होणार आहे. पुणे सांगली जालना नागपूर अमरावती धाराशिव अकोला परभणी या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही असणारी नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे. पुणे आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पेरणी ही शेतकऱ्यांची न झाल्यामुळे त्यांना 26000 या शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अधिक मंजूर आहे. आणि तसेच परभणी अकोला धाराशिव अमरावती नागपूर जालना या जिल्ह्यां करिता शेतकऱ्यांना बारा लाख 86 हजार 185 या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही लवकरच काही दिवसात पाच सहा दिवसात ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निश्चित येणार आहे.
अशाच नवनवीन शेतकऱ्यांच्या हिताच्या माहितीसाठी येथे क्लिक करा