Crop Insurance Claim शेतकरी मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड याचबरोबर इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे या 24 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये चांगलेच पिकाचे नुकसान हे झालेले होते. आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून 52 लाख शेतकऱ्यांना या 24 जिल्ह्यासाठी सुमारे 2216 कोटी रुपये इतका आगरीन पिक विमा हा या शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यासाठी मंजूर हा झालेला आहे.
ही पीक विम्याची रक्कम 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर देखील करण्यात आले आहे. यामधील १९६० कोटी रुपयांचे रक्कम आजपर्यंत शेतकऱ्यांना वितरित देखील करण्यात आलेली होती. आणि त्यासोबतच आता 634 कोटी रुपयांचं वितरण हे देखील शेतकऱ्यांना सुरू आहे. अशी माहिती मीडियाशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री तथा श्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिलेली आहे.
या 24 जिल्ह्यासाठी तेथील स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीला अनुसरून किंवा 25% अग्रीम पिक विमा देण्याबाबत शेतकऱ्यांसाठी ही अधिसूचना एक प्रकारे काढण्यात देखील आलेली आहे. मात्र, त्याच्या विरोधात काही कंपन्या आणि जिल्हा प्रशासन व विभाग तारांवर यासाठी आपिल देखील केलेली होती. आणि ती केलेले अपील या ठिकाणी आता फेटाळून ही लावण्यात आलेली आहे.. यामध्ये बऱ्याच काही कंपन्यांनी आपली अपील ही राज्यस्तरीयंत्रांत्रिक सल्लागार या समितीकडे सुद्धा अपील केली.Crop Insurance Claim
यामध्ये अद्यापही काही कंपन्यांनी आपली ही स्वीकारलेली नाही. यामधील निकाल निघाल्यानंतर आणखीन मोठी वाढ या पिक विमा रकमेमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. असे देखील स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे. यामध्येच शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी अशी देखील बाब यावर पत्रकारांनी उपस्थित केली. परंतु एक हजार रुपये पेक्षा कमी असलेल्या विमा रक्कमेवर शेतकऱ्यांना कमी मिळालेले आहे त्या शेतकऱ्यांना आणखी पिक विमा मिळेल याबाबत देखील चांगल्या प्रकारे कारवाई सुरू आहे अशी देखील माहिती मुंडे यांनी सांगितली.Crop Insurance Claim
थंडीची लाट ही आजही कायम, राज्यांमधील या भागामध्ये तापमानात घट कायम