Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विदर्भात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.15 डिसेंबरपर्यंत राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (13 डिसेंबर) मन्नार परिसरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच ते वायव्य दिशेकडे सरकत असून पुढील 12 तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील चारही विभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच येत्या ४ ते ५ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र, विदर्भात फारसा बदल होणार नाही.
पुण्यात पुढील 3 दिवस म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत आकाश बहुतांशी निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. 16 ते 18 डिसेंबरपर्यंत पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील तापमानात वाढ झाली होती. मात्र, यंदा मुंबईत गेल्या 9 वर्षांतील सर्वाधिक आणि सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या मुंबई आणि उपनगरे आणि ठाणे, पालघर, नवी मुंबई या शहरांमध्ये थंडीची लाट वाढणार आहे.पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरात आकाश बहुतांशी निरभ्र राहील. कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट झाली आहे.
कोकणात थंडी वाढली आहे
फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील थंडी गायब झाली होती. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
जानेवारी महिन्यात कापसाला मिळणार एवढा भाव? | पहा लगेच कापूस बाजार भाव..